लाईफ स्किल्स : तुमच्या बलस्थानांचा फायदा घ्या


कामाच्या जागेवरील तणावाबरोबर कसा सामना करावा हा सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे. त्यातून ज्यांना मार्ग काढतो येतो ते प्रगती करतात यात शंका नाही. कर्मचारी आणि ते काम करीत असलेली संस्था हे दोघे मिळून काही मार्गांनी त्यावर मात करू शकतात. मात्र हे उपाय कोणते आहेत याची माहिती असायला हवी.Take advantage of your strengths

या कामी इकिगाईचे तत्त्व उपयोगी ठरते. इकिगाई हा जपानी शब्द असून, सकाळी उठण्याचे कारण असा त्याचा अर्थ होतो. जीवनाचा उद्देश किंवा जीवन जगण्याचे कारण असाही त्याचा अर्थ होतो. प्रत्येकाची एक इकिगाई असल्याचे हे तत्त्व मानते.

ज्यांच्यावर आपले प्रेम आहे, जे काम करण्यात तुम्ही कुशल आहात, ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत या चार गोष्टी इकिगाईमध्ये आवश्यक आहेत. कराल ते काम उत्कृष्ट करणे, वेळीच नाही म्हणायला शिकणे, ऊर्जा वाचविणे, स्वयंविकास करणे आदी मार्गांनी तुम्ही इकिगाई करू शकता.

तणाव ओळखणे ही त्यापासून दूर होण्याची पहिली पायरी आहे. करीत असलेल्या कामाचा आपण आनंद घेतोय की टाळाटाळ करत करतोय की चिंतेचे ओझे घेऊन काम करतोय हे पाहा. जीवन आणि कामाचा समतोल साधायला हवा. त्यासाठी स्वत:च्या कामाचे बारकाईने निरीक्षण करा आणि तणावापासून दूर राहा. तुम्ही तुमच्या बलस्थानांचा फायदा घ्यायला हवा. आपण कमी पडत असलेल्या कामाकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तुमचे बलस्थान असलेल्या कामावर भर द्या.

फक्त बोलत राहू नका. त्यामुळे तुम्हाला कामाचे गांभीर्य नसल्याचे दिसते. आपण कमी पडत असलेल्या कामाकडे जास्त लक्ष देण्यामुळे तणावाला निमंत्रण मिळते हे लक्षात ठेवा. जीवनाच्या हेतूचा विचार करणारी इकिगाई ही जपानी पद्धत आहे. या विचारसरणीनुसार, आपण आपले काम समाधान आणि आनंदात करावयाचे असते. एरव्ही दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मदत करत असल्याची आपली भावना असते. एकदा ही इकिगाई विचारसरणी आत्मसात केल्यावर कामाचा तणाव कमी होऊन आपण कामाचा आनंद घ्यायला शिकतो.

Take advantage of your strengths

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण