तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली

Washing off my sins Says BJP Tripura MLA Ashish Das also performs havan, takes dip in Ganga ahead of joining TMC

BJP Tripura MLA Ashish Das : प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” करून आपले मुंडन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. Washing off my sins Says BJP Tripura MLA Ashish Das also performs havan, takes dip in Ganga ahead of joining TMC


प्रतिनिधी

गुवाहाटी : प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” करून आपले मुंडन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली.

त्यांनी त्रिपुराच्या सत्ताधारी भाजपवर राज्यात “राजकीय अराजकतेला” प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की, राज्यातील जनता राज्य सरकारच्या कामकाजावर आणि कामगिरीवर नाखुश आहे, म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आशिष दास गेल्या दोन वर्षांपासून त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचे कट्टर टीकाकार आहेत. त्यांनी यापूर्वी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले होते आणि ते पंतप्रधानपदासाठी सर्वात पात्र असल्याचे म्हटले होते. त्रिपुरा निवडणुकीकडे डोळे लावून बसलेले दास लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार, असा अंदाज आधीपासूनच होता. त्रिपुरामध्ये 2023च्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

आशिष दास म्हणाले, “आज मी भाजप सरकारच्या चुकीच्या कारभाराचा पश्चाताप म्हणून माझे मुंडन केले आहे. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे पुढचे पाऊल वेळच ठरवेल. परंतु भाजपच्या नेतृत्वातील शासनात त्रिपुरामध्ये ज्या प्रकारची अराजकता आहे आणि चुकीचा कारभार पाहिला आहे, त्याने मला असे करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे मी या सर्व चुकीच्या कामांवर टीका करत आहे. मी पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे असलेल्या लोकांसाठी काम करत आहे.”

दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई?

दरम्यान, काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दास यांच्यावर भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर त्रिपुराच्या सूरमा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बहुतेक सरकारी मालमत्ता खासगी संस्थांना विकल्याबद्दल टीका केली आहे.

ते म्हणाले, “एकेकाळी, मोदींच्या संदेशांनी देशभरातील सर्व वर्गांच्या लोकांमध्ये एक खळबळ उडवून दिली होती. मोदी एकदा ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणाले होते पण आता तो एक लोकप्रिय जुमला बनला आहे.’ याआधी, दास यांनी ममता बॅनर्जी यांची भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्याबद्दल खूप कौतुक केले होते आणि म्हटले होते की, अनेक लोक आणि संघटनांना बॅनर्जींना पंतप्रधान म्हणून बघायचे आहे आणि त्या एक बंगाली असल्याने त्यांची या पदावर पदोन्नती खूप महत्त्वाची आहे.

Washing off my sins Says BJP Tripura MLA Ashish Das also performs havan, takes dip in Ganga ahead of joining TMC

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण