Raj Thackeray : राज ठाकरे यांची “संभाव्य” केंद्रीय सुरक्षाव्यवस्था जितेंद्र आव्हाडांना टोचली!!


प्रतिनिधी

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना काही मुस्लिम संघटना धमक्या देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा व्यवस्था देण्याची तयारी करत आहे. परंतु, ही केंद्रीय सुरक्षा व्यवस्था ठाकरे – पवार सरकारमधले राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टोचली आहे. राज ठाकरे यांना मोसाद – सीआयए या संघटनांची सुरक्षाव्यवस्था पूरवा. आमचे काही जात नाही, असे खोचक उद्गार जितेंद्र आव्हाड यांनी काढले आहेत.Raj Thackeray: Raj Thackeray’s “possible” central security system hit Jitendra Awhad

रविवारी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली. यानुसार राज ठाकरे हे ५ मे रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यापूर्वी केंद्र सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. तसेच पुण्यातूनही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या संघटनेच्या अफजल तांबोळीने त्यांना धमकी दिली होती त्यानंतर आता केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.



दौऱ्यापूर्वी केंद्र वाढवणार राज ठाकरेंची सुरक्षा

सध्या राज ठाकरे यांना “वाय प्लस” सुरक्षा आहे. त्यात आता केंद्र सरकारदेखील त्यांना अधिकची सुरक्षा पुरविण्याच्या विचार करत आहे. यासह ५ जून रोजी ते अयोध्या दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारदेखील त्यांना त्यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अधिक सुरक्षा देणार आहे.

3 मे नंतर हिंदूंनी तयार राहावे, राज ठाकरेंचे आवाहन

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज ठाकरेंविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता.

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. यानंतर त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर वक्तव्य केले होते. यावेळी ते म्हणाले, माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक आहे. तर दुसरीकडे 3 मे नंतर हिंदूंनी तयार रहा, असे आवाहन केले होते. राज ठाकरेंच्या याच आक्रमक भूमिकेनंतर केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

जितेंद्र आव्हाडांची शेरेबाजी

आम्ही शंभर – दोनशे वेळा पंढरपूर, तुळजापूरला जातो. तेव्हा असे काही जाहीर करून जातो का? पण कुणी कुठे कुठला देवाच्या दर्शनाला कोणी जायचे हे ज्याचं त्याने ठरवायचे आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Raj Thackeray: Raj Thackeray’s “possible” central security system hit Jitendra Awhad

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात