Nawab Malik ED : नवाब मलिकांना पुन्हा दणका; कोठडीतला मुक्काम 22 एप्रिल पर्यंत वाढला!!


वृत्तसंस्था

मुंबई : ठाकरे – पवार सरकार मधील बिन खात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 4 दिवस म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मलिकांना देण्यात आलेली त्यांची कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने कोठडी सुनावली. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.  Hit Nawab Malik again; The stay in custody was extended till April 22

न्यायालयात काय घडले?

नवाब मलिकांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.



 

ईडीकडून पुन्हा कोठडी देण्याची मागणी 

नवाब मलिकांवर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकरसंबंधित मालमत्तांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहेत. यावरून त्यांचे नाव दाऊद इब्राहिमशीदेखील विरोधकांनी जोडले आहे. या प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. ईडी कोठडीनंतर मलिक आता ऑर्थर रोड येथील न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना ईडीने विशेष न्यायालयात हजर केले होते. सुनावणी दरम्यान या प्रकरणी अधिक चौकशीसाठी मलिक यांची पुन्हा कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. त्याला मंजूर करत ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना आता २२ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Hit Nawab Malik again; The stay in custody was extended till April 22

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात