Raj Thackeray : देशभर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याची तयारी करा; राज ठाकरेंचे आवाहन!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय काढताच त्याला देशभर जो प्रतिसाद मिळाला त्यातूनच त्यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत देशावर भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावण्याची तयारी करा, असे आवाहन केले आहे.Raj Thackeray: Prepare to make Hanuman Chalisa on trumpets all over the country; Raj Thackeray’s appeal !!

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर केवळ ठाकरे – पवार सरकारच नाही तर देशातील अन्य राज्यांमधील राज्य सरकारांना देखील टार्गेटवर घेतले आहे. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही. तो सामाजिक विषय आहे. मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेला विरोध नाही पण त्यांना जर मशिदींवरचे भोंगे उतरवायचे नसतील तर आम्हीही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावणारच. किंबहुना तो लावण्याची तयारी संपूर्ण देशभर करावी, असे आवाहन राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधवांना पत्रकार परिषदेत केले.



दिल्लीसह देशात काही ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जयंती मिरवणुकांवर समाजकंटक गुंड माफियांनी दगडफेक केली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, की आमचे हात देखील बांधलेले नाहीत. आम्हीही हातात दगड घेऊ शकतो. दगडच काय पण मिळेल ते हत्यार घेऊन आम्ही प्रतिकार करू शकतो. पण आम्हाला तसे करायला लावू नका, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

त्याचवेळी राज ठाकरे यांनी 3 मे ईद सणापर्यंत मला काही बोलायचे नाही, पण नंतर मुसलमानांनी मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात भोग्यांवर हनुमान चालीसा लावला जाईल, असा इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा आणि देशाच्या संविधानात पेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, असे ते म्हणाले आहेत. मूळात अनधिकृत भोंगे उतरवलेच पाहिजेत. त्यांना परवानगी देऊ नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत!!

  • ठाकरे परिवारात सुरू झालेल्या हिंदुत्वाच्या शर्यतीत आज राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भर घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मे महिन्यात अयोध्येचा दौरा करणार आहेत, तर राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येत पोहोचणार आहेत.
  • राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये अयोध्या दौऱ्याची तारीख त्यांनी सांगितली. 5 जूनला मनसेचे नेते आणि मनसैनिकांसमवेत ते अयोध्येत जाऊन रामलल्ला यांचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याचे तपशील नंतर जाहीर करण्यात येतील.
  • तसेच 1मे महाराष्ट्र दिन संभाजीनगर मध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेची देखील घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. बऱ्याच दिवसात प्रवास केला नाही म्हणून संभाजीनगरचा दौरा करत आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.
  • त्याच वेळी संपूर्ण देशातल्या जनतेला भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याची तयारी सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुसलमानांना या देशाच्या आणि देशातील कायदा राज्यघटनेपेक्षा आपला धर्म मोठा वाटत असेल तर ते गैर आहे. कायद्याचे सगळ्यांनीच पालन केले पाहिजे. मुसलमानांच्या प्रार्थनेला विरोध नाही, तर भोंग्यांना विरोध आहे. त्यांनी भोंगे उतरवले तर आम्हाला हनुमान चालीसा लावण्याची गरज नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
  • देशभर रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणूका यांवर काही ठिकाणी दगडफेक झाली. त्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे यांनी आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हाला हातात दगड घेता येतात. पण ते आम्हाला घ्यायला लावू नका, असा इशारा दिला आहे.
  • 1 मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर मध्ये मनसेची जाहीर सभा आणि 5 जूनचा राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा या दोनच घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी आजची परिषद पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दोन-तीनच प्रश्नांना थोडक्यात उत्तरे देऊन त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

Raj Thackeray : Prepare to make Hanuman Chalisa on trumpets all over the country; Raj Thackeray’s appeal !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात