BJP Answer : मोदींना प्रश्न विचारणारे 13 नेते दुटप्पी; बंगाल – राजस्थान हिंसाचाराबद्दल गप्प!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कथित हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे 13 नेते स्वतःच दुटप्पी आहेत. ते बंगाल आणि राजस्थान मधल्या हिंसाचाराबद्दल बद्दल मूग गिळून गप्प बसतात, असा पलटवार भाजपने केला आहे. BJP Answer: 13 leaders questioning Modi; Bengal-Rajasthan silent on violence !!

ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यासह 13 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरातील हिंसाचाराच्या घटनांबद्दल आपण गप्प का?, असा सवाल केला आहे. त्या मुद्द्यावर भाजपने आज सविस्तर उत्तर दिले आहे. भाजपच्या राजवटीत जिथे हिंसाचार होतो, तेथे गुंड माफिया यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई होते. मध्य प्रदेशातले उदाहरण द्यायचे झाले, तर खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या गुंड माफियांच्या घरांवर मध्यप्रदेश सरकारने कायदेशीर कारवाई करून बुलडोजर चालवले. परंतु, राजस्थानात करौली हिंसाचारात प्रमुख आरोपी असलेला मुलतबा अहमद हा बऱ्याच वर्षापासून फरार आहे. त्याला राग पकडण्यात राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारला अपयश आले आहे. याबद्दल विरोधी पक्षांचे 13 नेते मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.



त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन देशातील हिंसाचार याबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. पण त्या स्वतः ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्या पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला आहे. रोज राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. परंतु, त्याविषयी स्वतः ममता बॅनर्जी आणि त्यांच्याबरोबर असे 12 नेते एक अवाक्षरही बोलायला तयार नाहीत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते राहुल भाटिया यांनी केला आहे.

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते नेहमीच हिंसाचाराबद्दल दुटप्पी भूमिका घेतात. किंबहुना त्यांची भूमिका ही मुस्लिम लांगुलचालनाची असते. त्यांना कुठलाही हिंसाचार फक्त एकतर्फी दिसतो आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचे असते, असा टोलाही गौरव भाटिया यांनी लगावला आहे.

BJP Answer : 13 leaders questioning Modi; Bengal-Rajasthan silent on violence !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात