पुण्यातून गोव्याला निघालेली बस जळून खाक; खासगी ट्रॅव्हलला आग; ३७ प्रवासी बचावले


वृत्तसंस्था

पुणे : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक घडली. Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed

वैभववाडी तालुक्यात या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ३७ प्रवासी बचावले आहेत. तर एक ज्येष्ठ महिला जखमी झाली. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली. तेव्हा बसने पेटली. चालकाने बस थांबवली. प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोट येऊ लागले व बस आगीत भस्मसात झाली.

Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण