गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा


विशेष प्रतिनिधी

सिडनी : पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्येजून २०२० मध्ये, भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत ३८ चीनी सैनिक ठार झाले होते. द क्लॅक्सन या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ही बाब समोर आली आहे. ही संख्या चीनने नोंदवलेल्या संख्येपेक्षा ९ पट अधिक आहे. दीड वर्षांच्या संशोधनानंतर हा अहवाल तयार केला आहे. Big revelation on Galwan: 38 Chinese soldiers were swept away in the river in the encounter, but told by china that only 4 soldiers were killed.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांची टीम तयार केली होती. ‘गलवान डीकोडेड’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. अँथनी क्लानच्या नेतृत्वाखालील विशेष अहवालात असे म्हटले आहे की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे अनेक सैनिक त्या रात्री गलवान नदीत वाहून गेले.
अमेरिकन वृत्तपत्र न्यूज वीकने दावा केला आहे की १५ जून रोजी गलवानमधील चकमकीत ६० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. चीनने गलवानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या कधीच दिली नाही, परंतु गेल्या वर्षी चकमकीत मारल्या गेलेल्या चार सैनिकांना पदक जाहीर केले. खरे तर १५-१६ जूनच्या रात्री शून्य अंश तापमानात वाहणाऱ्या गलवान नदीत अनेक पीएलए सैनिक बुडाले.

चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोच्या ब्लॉगच्या आधारे मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की त्या रात्री ३८चीनी सैनिक नदीत वाहून गेले. नंतर चिनी अधिकाऱ्यांनी या सर्व सोशल मीडिया पोस्ट काढून टाकल्या. या ३८ जणांमध्ये ज्युनियर सार्जंट वांग झुओरान यांचाही समावेश होता, ज्यांना चीनने पदक जाहीर केले आहे.

Big revelation on Galwan: 38 Chinese soldiers were swept away in the river in the encounter, but told by china that only 4 soldiers were killed.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात