विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षांनी मतदारांना आपलंसं करण्यासाठी कंबर कसली आहे. हरदोई जिल्ह्यातील शहााबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार आणि उमेदवार रजनी तिवारी या एका कार्यक्रमात भावूक झाल्या आणि ढसाढसा राडल्या देखील. BJP MLAs who cried during the campaign insisted on apologizing if they made a mistake
शाहाबाद येथे कार्यकर्ता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकांना संबोधित करताना रजनी तिवारी रडल्या. त्या म्हणाल्या की येथे बाहेरचा कोणी बसलेला नाही. तुम्ही सर्व आमच्या कुटुंबातील सदस्य आहात. येथे बैठक नाही. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर. भविष्यात माझ्याकडून चुका झाल्या तर मला सोडू नका. विरोधकांनी सोशल मीडियावर माझ्याविरोधात लिहिले तर चालेल, पण स्वत:च्या लोकांनी लिहिलं तर ते सहन होत नाही. भाजप हे माझे कुटुंब आहे.
रजनी तिवारी म्हणाल्या की, मी बाहेरची नाही. भाजप हे माझे कुटुंब आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी या पक्षात असेन. स्त्रीचे अश्रू ही कमजोरी नसून ती तिची शक्ती बनतात. तिने जे काही काम करायचे ठरवले ते पूर्ण करते. संपूर्ण कार्यकाळात अनेक विकासकामे केली, जी काही राहिली त्याबद्दल मी माफी मागते. रजनी तिवारी यांनी बीएसपी सोडून २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि शाहाबादमधून निवडणूक जिंकली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App