गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाही स्टार प्रचारकांची भलीमोठी 24 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. पण स्टार प्रचारकांची यादी कितीही भली मोठी असली तरी नेमके गोव्यात राष्ट्रवादीचे उमेदवार किती?, हा प्रश्न आता विचारला जात आहे. Large list of NCP’s 24 star campaigners in Goa, but exactly how many candidates ??

जे गोव्याचे तेच उत्तर प्रदेशाचे. गोव्यासाठी राष्ट्रवादीची 24 जणांची स्टार प्रचारकांची यादी आहे आहे, तर उत्तर प्रदेशासाठी तब्बल 40 नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादीने रिलीज केली आहे. तिथे देखील राष्ट्रवादीचे उमेदवार नेमके किती? हा प्रश्न विचारण्यात येत आहे.



गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. या सर्व जागा भाजपा स्वतंत्रपणे लढवत आहे. काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपल्या आघाडीत घेतलेले नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी नेमके आपण किती जागा लढवणार आहेत हे अजूनही जाहीर केलेले नाही. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष के के शर्मा यांना सुरुवातीला समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला नंतर तो पाठिंबा रद्दही केला. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा लढवणार? हे देखील स्पष्ट नाही. पण दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची भलीमोठी यादी मात्र प्रसिद्ध केली आहे.

गोवा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज स्टार प्रचारकांची फौज पुढील प्रमाणे

  • १. शरद पवार
  • २. प्रफुल्ल पटेल
    ३. सुनील तटकरे
    ४. सुप्रिया सुळे
    ५. अजित पवार
  • ६. दिलीप वळसे पाटील
    ७. जयंत पाटील
    ८. जितेंद्र आव्हाड
    ९. नवाब मलिक
  • १०. धनंजय मुंडे
    ११. हसन मुश्रीफ
    १२. ए. के. शशींद्रन (केरळमधील वनमंत्री)
    १३. नरेंद्र वर्मा
  • १४. फौजिया खान
    १५. धीरज शर्मा
    १६. सोनिया दुहान
    १७. शब्बीर अहमद विद्रोही
  • १८. जोस फिलीप डिसुजा
    १९. प्रफुल्ल हेडे
    २०. अविनाश भोसले
    २१- सतीश नारायणी
  • २२. पी. सी. चाको
    २३. थॉमस के. थॉमस (आमदार, केरळ )
    २४. क्लेडे क्रास्टो

Large list of NCP’s 24 star campaigners in Goa, but exactly how many candidates ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात