वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरच्या निवडणुकीत राहुल गांधींकडून चप्पल, बुटाचा प्रचारासाठी वापर केल्याचे उघड होत आहे. याबाबतची हकीकत अशी की, एकदा गृहमंत्री अमित शाह घरात चप्पल घालून बसले होते. तेव्हा त्यांना भेटायला मणिपूरचा एक नेता आला. तेव्हा नेत्यांना बुट काढायला लावले. for Manipur elections Slippers and shoes are also used for propaganda by Rahul Gandhi
चप्पल आणि बूट घरात येण्यापूर्वी बाहेर काढून यायची पद्धत आहे.त्या नुसार शहांच्या घरात प्रवेश करताना मणिपूरमधील नेत्याला बुट काढण्याचा आदेश दिला गेला. त्याचे भांडवल राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मणिपूरच्या नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी दावा केला की मणिपूरच्या नेत्यांना अमित शाह यांच्या निवासस्थानी बुट काढण्यास सांगितले होते, तर ते स्वतः चप्पल घालून होते. दरम्यान, राहुल यांनी गृहमंत्र्यांवर त्यांच्या अत्यंत हास्यास्पद आरोप केल्याची टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली.
मणिपूरच्या नेत्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेल्या कथित गैरवागणुकीचा संदर्भ देत राहुल यांनी शहांच्या माफीची मागणी केली. शहांच्या घरात प्रवेश करताना मणिपूरमधील नेत्याला बुट काढण्याचा आदेश दिला गेला. ते अनवाणी आत गेले पण, शहा मात्र चप्पल घालून वावरत होते. हा दुजाभाव योग्य नाही. शहांनी संबंधित नेत्याची माफी मागितली पाहिजे, असे राहुल म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App