370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम आणि 35 ए हे उप कलम हटविल्यानंतर नेमका प्रशासनात काय बदल झाला आहे?, याची माहिती केंद्र सरकारने आज संसदेत दिली आहे. Government jobs for 1700 Kashmiri Pandits in Jammu and Kashmir after deletion of Article 370 !!

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी या संदर्भातले तपशील राज्यसभेत सादर केले आहेत. जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून 2019 – 2021 या दोन वर्षात तब्बल 1700 काश्मिरी पंडितांना जम्मू-काश्मीरच्या प्रशासनामध्ये विविध पदांवर नेमण्यात आले आहे. हे काश्मिरी पंडित सध्या प्रशासनामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती नित्यानंद यांनी दिली आहे.



त्याच बरोबर जम्मू-काश्मीरमधील ओबीसी समाज बकरवाल, गुजर, एससी, एनटी या समाजातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आरक्षण देऊन प्रशासनात समाविष्ट करण्यात आले आहे. अशी माहिती देखील नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली आहे.

Government jobs for 1700 Kashmiri Pandits in Jammu and Kashmir after deletion of Article 370 !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात