पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी शहरात झाली ४० लसीकरण केंद्र


लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी म्हणून आता पाचऐवजी ४० केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. Pune: 40 vaccination centers for 15 to 18 year olds in the city


विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपाहद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले आहे. महापालिकेने ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करताना पाच केंद्र निश्‍चित केली होती. मात्र, शहरातील लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने हे केंद्र अपुरे पडणार आहेत.



तसेच पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी म्हणून आता पाचऐवजी ४० केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत.त्यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू होत आहे.

दरम्यान लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Pune : 40 vaccination centers for 15 to 18 year olds in the city

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात