व्ही. एस. पठानिया यांची इंडियन कोस्ट गार्डचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती


सुरुवातीला पठानिया हेलिकॉप्टर पायलट म्हणून संरक्षण दलात रूजू झाले होते.याआधी त्यांनी इंडियन कोस्टगार्डच्या जनरल पॉलिसी ऍण्ड प्लान्सचे उपसंचालक म्हणून काम पाहिले आहे.V. S. Pathania Appointment of as the new Director General of Indian Coast Guard


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या सात हजार किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी इंडियन कोस्ट गार्डवर आहे. इंडियन कोस्ट गार्डचे नवे महासंचालक म्हणून निष्णात हेलिकॉप्टर पायलट व्ही. एस. पठानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पठानिया यांनी के नटराजन यांची जागा घेतली आहे.

व्ही. एस. पठानिया हे गेल्या ३५ वर्षापासून संरक्षण दलात कार्यरत आहेत.पठानिया हे मुळचे हिमाचलचे आहेत.सुरुवातीला पठानिया हेलिकॉप्टर पायलट म्हणून संरक्षण दलात रूजू झाले होते.याआधी त्यांनी इंडियन कोस्टगार्डच्या जनरल पॉलिसी ऍण्ड प्लान्सचे उपसंचालक म्हणून काम पाहिले आहे.तसेच कोस्टगार्डच्या उत्तर-पश्चिम विभागाचे आणि पश्चिम विभागाचे कमांडर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.पठानिया हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

V. S. Pathania Appointment of as the new Director General of Indian Coast Guard

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण