एलईडी बल्ब फक्त १० रुपयांत, केंद्राची ग्राम उजाला योजना; एका दिवसात १० लाख बल्बचे वाटप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ग्राम उजाला योजनेअंतर्गत फक्त १० रुपयात एलईडी बल्ब देण्यात येत असून गेल्या वर्षी एका दिवसांत १० लाख बल्बचे वाटप करण्यात आले आहे. ग्राम उजाला योजना बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येत आहे.LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day

सरकारी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (CESL) ग्राम उजाला योजनेंतर्गत ५० लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी योजने अंतर्गत केली आहे.



सीईएसएलने गेल्या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात १० रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब देण्याची योजना सुरू केली. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, २०२१ च्या निमित्ताने एकाच दिवसात १० लाख एलईडी बल्ब वितरित केले.

तीन वर्षांच्या हमीसह 7W आणि 12W एलईडी बल्ब कंपनीकडून दिले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त ५ बल्ब मिळू शकतात. वीज बचतीसह प्रखर प्रकाश असा दुहेरीसंगम साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात