मोदी सरकारची ग्राम उजाला योजना, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १० रुपयांत एलईडी बल्ब

देशातील सर्व गावांपर्यंत वीज पुरविण्याचे आपले आश्वासन पूर्ण केल्याने आता मोदी सरकारने ग्राम उजाला योजना जाहीर केली आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबांना 10 रुपये दराने एलईडी बल्ब देण्यात येणार आहे.Modi government’s Gram Ujala Yojana, LED bulbs at Rs 10 per rural family


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील सर्व गावांपर्यंत वीज पुरविण्याचे आपले आश्वासन पूर्ण केल्याने आता मोदी सरकारने ग्राम उजाला योजना जाहीर केली आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबांना 10 रुपये दराने एलईडी बल्ब देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पाच राज्यांमधील गावांमध्ये स्वस्त दरात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टप्प्यात आरा (बिहार), वाराणसी (उत्तर प्रदेश), विजयवाडा (आंध्र प्रदेश), नागपूर (महाराष्ट्र) आणि पश्चिम गुजरातमधील ग्रामीण कुटुंबांना दीड कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत.कार्बन क्रेडिट्सद्वारे संपूर्ण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल आणि हा भारतातील पहिला कार्यक्रम आहे. उर्जा मंत्री आर. के. सिंह बिहारच्या आरा जिल्ह्यातून डिजिटलपणे या कार्यक्रमाची सुरूवात करताना म्हणाले,

खेड्यांमध्ये राहणाºया लोकांना स्वस्त दर आणि उच्च प्रतीचे छएऊ बल्ब उपलब्ध करून देण्याचा तोडगा आम्ही शोधून काढला. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.ग्राम उजाला कार्यक्रमांतर्गत ग्रामीण कुटुंबांना तीन वषार्ची वॉरंटीसह 7 वॅट आणि 12 वॅटचे एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत.

हे बल्ब जुन्या पारंपरिक बल्ब (इनकॅन्डेसेंट बल्ब) जमा करण्यावर दिले जातील. ग्राम उजाला योजनेंतर्गत ग्राहक नियमित बल्ब देऊन जास्तीत जास्त 5 एलईडी बल्ब घेऊ शकतात. या ग्रामीण कुटुंबात येथे मीटर बसविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाचा हवामान बदलावरील भारताच्या सुरू असलेल्या मोहीमेवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. यामुळे वषार्काठी 16.5 लाख टनांनी कार्बन उत्सर्जनात घट होते, तर 202.5 कोटी युनिट (केडब्ल्यूएच) विजेची बचत होईल. यामुळे घरांमध्ये परवडणाºया दराने अधिक चांगला प्रकाश मिळेल.

Modi government’s Gram Ujala Yojana, LED bulbs at Rs 10 per rural family

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*