GOOD NEWS : नवीन वर्षाची भेट! LPG सिलिंडर थेट १०० रुपयांनी स्वस्त ; व्यावसायिकांना फायदा …


विशेष प्रतिनिधी

मुंबई : इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या  (Commercial LPG Cylinder Rates) दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Commercial LPG Cylinder directly cheaper by Rs 100) GOOD NEWS: New Year’s gift! LPG cylinders directly cheaper by Rs 100; Professionals benefit …

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या  (LPG Cylinder) किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.



व्यावसायिक सिलिंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Rates) कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.
100 रुपयांच्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2001 रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2077 रुपयांवर आली आहे. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1951 रुपये झाली आहे.

घरगुती सिलिंडरबाबत कोणताही बदल नाही

यावेळीही घरगुती सिलिंडरच्या  (LPG Cylinder) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये त्याची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना मिळत आहे.

GOOD NEWS : New Year’s gift! LPG cylinders directly cheaper by Rs 100; Professionals benefit …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात