PM Modi Cabinet : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजपमधील तुलनेने नवख्यांना स्थान का? जाणून घ्या कारणे

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

PM Modi Cabinet Expansion : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी 13 दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे यांचा समावेश आहे. परंतु त्याचबरोबर नव्या 33 चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड अशा चार जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी हा मोठा फेरबदल आहे, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपसाठीही हा मोठा बदल मानला जात आहे. PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी 13 दिग्गज नेत्यांचे राजीनामे घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे यांचा समावेश आहे. परंतु त्याचबरोबर नव्या 33 चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड अशा चार जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी हा मोठा फेरबदल आहे, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपसाठीही हा मोठा बदल मानला जात आहे.

महाराष्ट्रातून ज्या चेहऱ्यांची निवड झाली आहे, त्यापैकी भागवत कराड हे गेली 20-22 वर्षे भाजपमध्ये आहेत. उर्वरित नेते मात्र महाराष्ट्र भाजपमध्ये नवखेच म्हणावे लागतील. हे चारही मूळचे भाजपायी नाहीत, ते यापूर्वी एकतर काँग्रेस, राष्ट्रवादी अथवा शिवसेनेत होते. तरीही या नेतेमंडळींना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यामागील कारणे काय आहेत, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

नारायण राणे

नारायण तातू राणे हे मूळचे शिवसैनिक नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि अलीकडेच भाजपवासी झाले. नारायण राणे हे महाराष्ट्रातले दमदार नेतृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदही भूषवलेले आहे. राज्यातील दिग्गज मराठा नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. नारायण राणे आणि शिवसेनेचे शत्रुत्व जगजाहीर आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला भिडण्यासाठी महाराष्ट्रात भाजपकडे तगड्या नेतृत्वाची गरज होती. याशिवाय कोकणात राणेंचा दबदबा आहे, पक्षविस्तार, मराठा नेता, माजी मुख्यमंत्री व शिवसेनेला आव्हान देणारा नेता म्हणून नारायण राणेंना संधी दिली असण्याची शक्यता आहे.

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

डॉ. भारती पवार

उत्तर महाराष्ट्रातील पवार घराणे हे राष्ट्रवादीकडेच होते. माजी मंत्री दिवंगत ए.टी. पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. दिवंगत ए.टी. पवार हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात. याशिवाय 95 मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले होते तेव्हा अपक्ष आमदार असलेल्या एटी पवारांना गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री केले होते. यानंतर ते राष्ट्रवादीकडे झुकले. 2019च्या निवडणुकीवेळी भारती पवार यांनी भाजप प्रवेश केला आणि दिंडोरीतून विजयही मिळवला. जिल्हा परिषदेपासून सुरुवात करणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. स्वत:चा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचं उभारलेलं जाळं यामुळे त्यांनी लोकसभेत सहज बाजी मारली. भारती पवारांच्या निमित्ताने भाजपने उत्तर महाराष्ट्रातील मोठं घराणं आपल्याकडे खेचून घेतलं आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळावर नजर टाकली तर यात डॉक्टरांचा भरणा अधिक असल्याचं दिसतं. कोरोना महामारीमुळे पीएम मोदींना या नव्या दमाच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे, हे स्पष्ट आहे. भारती पवार हे स्वत: डॉक्टर आहेत. त्यांच्या निवडीसोबत महाराष्ट्रातील एका महिला नेतृत्वालाही संधी मिळते आहे.

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

कपिल पाटील

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे कपिल पाटील यांनी 2014च्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ते सलग दोन वेळा भिवंडी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. कपिल पाटील हे ठाणे जिल्ह्यातून येतात. ठाण्यात शिवसेना व एकनाथ शिंदे यांचे प्रस्थ आहे. कपिल पाटील यांच्या मागे आगरी-कोळी समाजाचा मोठा जनाधार आहे. आता राज्यातील महापालिकांचे बिगुल कधीही वाजू शकते. दुसरीकडे, भाजपकडे ठाण्यात मोठा चेहरा नव्हता, यामुळे पुढील राजकीय आडाखे बांधून व शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कपिल पाटील यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली असू शकते.

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

डॉ. भागवत कराड

डॉ. भागवत कराड यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांच्यामुळेच ते भाजपशी जोडले गेले. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशीच त्यांची ओळख होती. निष्णात बालरोगतज्ज्ञ असणारे डॉ. कराड यांनी दोन वेळा औरंगाबाद महापालिकेचे महापौर पद भूषवलेले आहे. नुकतीच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्यात वंजारी समाजाला वाव दिला नसल्याचा आरोप भाजपवर होत आला आहे. ओबीसी- वंजारी समाजाच्या नेतृत्वात वाढ झाल्यास भाजपसाठी हे फायद्याचेच ठरणार आहे. दुसरीकडे, मुंडे कुटुंबाव्यतिरिक्त राज्यात इतरही वंजारी नेतृत्व आहे, हे यातून सुचवण्यात आले आहे. राज्यात ओबीसींसाठी पक्षाला आणखी एक चेहरा मिळावा हाही यामागे हेतू असू शकतो.

PM Modi Cabinet Expansion know the reason behind narayan rane kapil patil dr bharati pawar and Dr Bhagwat Karad gets ministry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात