OBC Leader Dr Bhagwat Karad in Modi Cabinet Instead Of Dr Preetam Munde

Modi Cabinet : प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी, मोदी-शहांचा सूचक इशारा!

Modi Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी जुन्या 13 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, तर नव्या 33 चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या यादीत चार नावे आहेत. ती म्हणजे नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि डॉ. भागवत कराड. दरम्यान, दुपारपर्यंत बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचेही नाव चर्चेत होते. यानंतर पंकजा मुंड यांनी स्वत: ट्वीट करून खुलासा केला की, खा. प्रीतम मुंडे या मुंबईतच आहेत. OBC Leader Dr Bhagwat Karad in Modi Cabinet Instead Of Dr Preetam Munde


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी जुन्या 13 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, तर नव्या 33 चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या यादीत चार नावे आहेत. ती म्हणजे नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि डॉ. भागवत कराड. दरम्यान, दुपारपर्यंत बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचेही नाव चर्चेत होते. यानंतर पंकजा मुंड यांनी स्वत: ट्वीट करून खुलासा केला की, खा. प्रीतम मुंडे या मुंबईतच आहेत.

प्रीतम मुंडे या उच्चशिक्षित आहेत. खासदारकीची त्यांची दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे ओबीसींच्या नेत्या आहेत. या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या वारस आहेत. तरीही त्यांचे मंत्रिमंडळात नाव का नाही, यावरून आता विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे आपल्या आक्रमक नेतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. तरीही मागच्या काही काळापासून पंकजा मुंडे या काहीशा दुरावलेल्या दिसून येतात. मध्यंतरी विधानसभा निवडणुकांआधी पंकजा मुंडे पक्ष सोडतात की काय, अशी चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ओबीसींचा मोठा जनाधार त्यांच्या मागे आहे.

दुसरीकडे, डॉ. भागवत कराड हे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपवासी झाले. याला 20 वर्षांचा काळ उलटला आहे. त्या मानाने कराड मूळ भाजपायी नाहीत. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. ओबीसी नेते असणाऱ्या डॉ. कराड यांना वर्षभरापूर्वीच राज्यसभेची खासदारकी मिळाली. भागवत कराड हे स्वत: उत्तम शल्यचिकित्सक आहेत. ते ओबीसी नेते आहेत. दुसरीकडे, प्रीतम मुंडे याही डॉक्टर आहेत ओबीसी नेत्या आहेत. परंतु तरीही त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहेत. त्यांची निवड करून मोदी-शहांनी पंकजा मुंडे यांना सूचक इशारा दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे भगिनी यांच्यामागे ओबीसी व वंजारी समाजाचा जनाधार असल्याचं सांगितलं जातं. परंतु याच समाजातून येणारे डॉ. भागवत कराड यांना केंद्रात संधी देऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजात इतरही नेते आहेत, बहुधा हे ध्वनित करायचे आहे. यात वावगंही काही नाही. कारण ओबीसी व वंजारी समाजातील नेतृत्व वाढले तर भाजपलाच फायद्याचे  ठरणार आहे. परंतु याचबरोबर या निवडीतून मुंडे भगिनींचं महत्त्व तर कमी केलं जात नाही ना, अशी चर्चा करण्यासही वाव आहे.

OBC leader Dr Bhagwat Karad in Modi Cabinet Instead Of Dr Preetam Munde

महत्त्वाच्या बातम्या