Modi Cabinate Expansion Prakash Javdekar And ravishankar Prasad Resigns Ahead Of Cabinate Expansion

Modi Cabinate Expansion : प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा, एकूण 13 जणांचे राजीनामे, नव्या 33 जणांना संधी

Prakash Javdekar And ravishankar Prasad Resigns : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली आहे. तथापि, मोदींच्या मंत्रिमंडळातून 13 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यात आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेही राजीनामे आहेत. तत्पूर्वी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, रावसाहेब दानवे पाटील, सदानंद गौडा, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी, देबोश्री चौधरी आणि थावरचंद गेहलोत यांनी राजीनामे दिले आहेत. Modi Cabinate Expansion Prakash Javdekar And ravishankar Prasad Resigns Ahead Of Cabinate Expansion


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली आहे. तथापि, मोदींच्या मंत्रिमंडळातून 13 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.

यात आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेही राजीनामे आहेत. तत्पूर्वी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, रावसाहेब दानवे पाटील, सदानंद गौडा, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी, देबोश्री चौधरी आणि थावरचंद गेहलोत यांनी राजीनामे दिले आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात 33 नव्या चेहऱ्यांना संधी

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आता समोर आली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. उदाहरणार्थ, नारायण राणे, सर्बानंद सोनेवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंदर प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मंडाविया आणि इतर अनेक नेते या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी

नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपति कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भूपेंदर यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदळजे, भानुप्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बीएल वर्मा, अजय कुमार, चौहान देवसिंह, भगवंत खुबा, कपिल मोरेश्वर पाटिल, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत किशनराव कराड, राजकुमार रंजन सिंह, भारती प्रवीण पवार, बिश्वेश्वर तुडुू, शांतनु ठाकूर, मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरुगन, निशीथ प्रामाणिक.

Modi Cabinate Expansion Prakash Javdekar And ravishankar Prasad Resigns Ahead Of Cabinate Expansion

महत्त्वाच्या बातम्या