PM Modi Cabinet Expansion : पीएम मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठ्या घडामोडी, शिक्षणमंत्री निशंक आणि सदानंद गौडांसह आतापर्यंत 5 मंत्र्यांचा राजीनामा

PM Modi Cabinet Expansion Today, five Ministers Given Resign ahead of Ceromony, Know About New Ministers in Modi Team

PM Modi Cabinet Expansion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी सहा वाजता विस्तार होणार आहे. या विस्तारासोबतच ही पंतप्रधान मोदींची सर्वात तरुण आणि प्रतिभावान टीम असेल, असे मानले जात आहे. यापैकी 24 नावे निश्चित करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे विद्यमान काही मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याखेरीज महिला व बालविकास मंत्री देबोश्री चौधरी, उर्वरक व रसायन मंत्री सदानंद गौडा आणि कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही राजीनामा दिला आहे. त्याचवेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला होता. PM Modi Cabinet Expansion Today, five Ministers Given Resign ahead of Ceremony, Know About New Ministers in Modi Team


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी सहा वाजता विस्तार होणार आहे. या विस्तारासोबतच ही पंतप्रधान मोदींची सर्वात तरुण आणि प्रतिभावान टीम असेल, असे मानले जात आहे. यापैकी 24 नावे निश्चित करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे विद्यमान काही मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याखेरीज महिला व बालविकास मंत्री देबोश्री चौधरी, उर्वरक व रसायन मंत्री सदानंद गौडा आणि कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही राजीनामा दिला आहे. त्याचवेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला होता.

वास्तविक मोदींचे लक्ष तरुण टीमला सोबत घेऊन कोरोना महामारी आणि अर्थव्यवस्थेला सुधारण्याकडे आहे. पुढच्या वर्षी 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय समीकरणांची दखल घेतली गेली असली तरी यात कौशल्याचे संतुलनही ठेवण्यात आले आहे. या मंत्रिमंडळाचे चित्रही जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, अनुपिया पटेल, नारायण राणे, हिना गावित, सुनीता दुग्गल, पशुपती पारस, मीनाक्षी लेखी यांच्यासह अनेक नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत.

टीम मोदींचे नवे चेहरे

1. ज्योतिरादित्य सिंधिया
२. सर्बानंद सोनेवाल
3. पशुपति नाथ पारस
4. नारायण राणे
5. भूपेंद्र यादव
6. अनुप्रिया पटेल
7. कपिल पाटील
8. मीनाक्षी लेखी
9. राहुल कसावा
10. अश्विनी वैष्णव
11. शांतनु ठाकूर
12. विनोद सोनकर
13. पंकज चौधरी
14. आरसीपी सिंग (जेडीयू)
15. दिलीश्वर कामत (जेडीयू)
16. चंद्रेश्वर प्रसाद चंद्रवंशी (जेडीयू)
17. रामनाथ ठाकूर (जेडीयू)
18. राजकुमार रंजन
19. बी एल वर्मा
20. अजय मिश्रा
21. हिना गावित
22. शोभा करंदलाजे
23. अजय भट्ट
24. प्रीतम मुंडे

PM Modi Cabinet Expansion Today, five Ministers Given Resign ahead of Ceremony, Know About New Ministers in Modi Team

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात