तू नट होशील!, पुण्यातील ज्योतिषाने दिलीप कुमार यांचे वर्तविले भविष्य खरे ठरले, खडकीच्या कँटीनमध्ये करत होते काम

विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार हे पुण्यातील खडकी येथील आर्मीच्या कँटीनमध्ये कामाला होते. यावेळी पुण्यातील एका ज्योतिषाने दिलीपकुमार यांना सांगितले होते की तू नट होशील.हे भविष्य खरे ठरले. You will be an actor !, Pune astrologers predicted about Dilip Kumar, that time he was working in a canteen at Khadki

अभिनेते युसुफ खान उर्फ दिलीपकुमार यांची महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाळ जोडलेली आहे. दिलीपकुमार यांचे वडील कॉन्ट्रॅक्टर होते.त्यावेळी दिलीपकुमार हेनाशिकमधील देवळाली येथे  शिक्षण घेत होते.वडिलांच्या व्यवसायात नुकसान झाल्यामुळे कॉलेजच्या तिस-या वर्षातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.  वडिलांच्या मित्राने पुण्यातील खडकीच्या
ब्रिटीश सैनिकांच्या कँटिनमध्ये त्यांना नोकरी लावली.

तिथे असिटंट मँनेजर म्हणून काम करीत असताना त्यांना 36 रूपये पगार मिळायचा. त्यात भागत नसल्याने  त्यांनी पुण्यात फळांचा स्टॉल टाकला होता.त्या काळात त्यांनी खूप चांगला पैसा कमावला. घरी देखील ते पैसे पाठवत असतं. ब्रिटीश सैनिकांबरोबर ते फुटबॉल देखील खेळत असतं. त्यानंतर ते मुंबईला गेले..पण पुण्याशी त्यांचे ॠणानुबंध जुळले ते अगदी कायमचेच!.महाराष्ट्रात शिक्षण झाल्यामुळे मराठीवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात भाषण किंवा संवाद साधताना त्यांना अडचण यायची नाही.
मराठीमध्ये करायचे भाषण  गानवर्धन संस्थेच्या पुस्तक प्रकाशनाच्याकार्यक्रमात त्यांनी जवळपास अर्धा तास मराठीमध्ये सुंदर भाषण केले होते.

अनेकांकडे त्याची रेकॉर्डिंग आजही उपलब्ध आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेला  ‘मुघले आझम’हा चित्रपट त्यांनी पहिल्यांदा फिल्म अँंड टेल्व्हििजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) येथे पाहिला. त्यांनी अनेक चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये पाहिले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2002 (पिफ) दिलीपकुमार यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा देखील त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधला होता.

You will be an actor !, Pune astrologers predicted about Dilip Kumar, that time he was working in a canteen at Khadki

महत्त्वाच्या बातम्या