लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती


विशेष प्रतिनिधी

बैरुत : कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देश आर्थिक संकटात आहेत. मात्र, लेबनान या देशावर भीषण आर्थिक संकट आले आहे. देशातील चलन ९० टक्यांहून अधिक कमी झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने देशाला वाचवावे असे तेथील काळजीवाहू पंतप्रधान हसन डिआब यांनी म्हटले आहे. अन्यथा देशात सामाजिक विस्फोट होईल असे म्हटले आहे.Lebanon in huge economic crisis, fear of mass eruption

जागतिक बॅँकेने म्हटले आहे की आधुनिक इतिहासातील सर्वात भयंकर आर्थिक संकटात लेबनान फसवला आहे.त्यामुळे देशातील ९० टक्केंहून अधिक लोकसंख्या गरीबीमध्ये ढकलली गेली आहे. इंधन घेण्यासाठीही देशाकडे पैसे नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर दररोज मारामाºय होत आहेत. त्यामुळे देशात जनतेचा उद्रेक होण्याची भीती पंतप्रधानांनीच व्यक्त केली आहे.



पंतप्रधान डिआब यांनी राजधानी बैरूतमध्ये विविध देशांतील राजदूतांची बैठक घेतली. यावेळी लेबनान सामाजिक विस्फोटापासून काही दिवसच दूर असल्याचे सांगून डिआब म्हणाले त्यांचा देश एकटा पडला आहे. नवीन मंत्रीमंडळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी बोलणी कररण्यास तयार आहे. मात्र, देशातील विद्यमान सरकारला रिकव्हरी योजना लागू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करण्याचा अधिकार नाही.

चार ऑ गस्ट रोजी बैरूत येथील बंदरात एक विनाशकारी स्फोट झाला होता. त्यामुळे डिआब यांनी राजीनामा दिला होता. सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत. मात्र, नव्या सरकारवर देशातील धार्मिक नेत्यांचा विश्वास राहिलेला नाही. युरोपियन युनियननेही म्हटले आहे की देशाच्या आर्थिक संकटासाठी हे सरकारच कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांना प्रतिबंधांचा सामना करावा लागेल.

Lebanon in huge economic crisis, fear of mass eruption

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात