Mansoon Session 2021 : देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच!

Mansoon Session 2021 LoP Devendra Fadnavis Press Conference criticized Thackeray Govt

Mansoon Session 2021  : राज्य विधिमंडळाचे दोनदिवसीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरले. महाविकास आघाडी सरकारने या दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके व ठराव मंजूर केले. याच दरम्यान भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे. विधानभवनासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. Mansoon Session 2021 LoP Devendra Fadnavis Press Conference criticized Thackeray Govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोनदिवसीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरले. महाविकास आघाडी सरकारने या दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके व ठराव मंजूर केले. याच दरम्यान भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे. विधानभवनासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे. पांडवांनी कौरवांना केवळ सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो, दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दुशासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असं फडणवीस म्हणाले.

सत्ता डोक्यात गेल्यावर विरोधकांची गरज संपते

फडणवीस म्हणाले की, सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजून घ्यायचो. आता कोणीही चर्चा करण्यासाठी येत नाही. कारण डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक फार काळ टिकत नाहीत.

…तोपर्यंत लढत राहणार

फडणवीसांनी प्रतिरूप विधानसभेच्या कामकाजाचा आढावा माध्यमांना सांगितला. यावेळी 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सरकारविरुद्ध निंदाव्यंजक ठराव मंजूर केला. ही प्रतिरूप विधानसभा पाच तास सुरू होती. फडणवीस म्हणाले की, या प्रतिरूप विधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाहीत, तर शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारने कृषी कायदे अखेर स्वीकारलेच, सुधारणा किरकोळ आहेत

फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारने आज आणलेल्या तीन कृषी विधेयकांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, अखेर आम्ही इतके दिवस जे सांगत होतो, ते राज्य सरकारनं ऐकलं याचं स्वागत आहे. राज्य सरकारने कृषी कायद्यांमध्ये किरकोळ सुधारणा केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे केंद्राचे जे तीन कायदे आहेत, त्यातील दोन कायदे पूर्वीपासूनच महाराष्ट्रात लागू आहेत. आणि राज्य सरकारनं यात किरकोळ सुधारणा केल्या आहेत. या विधेयकांवर अजून चर्चा झालेली नाही. दोन महिन्यांसाठी यावर जनतेतून अभिप्राय मागवण्यात येणार आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात बोलण्याची संधी मिळाल्यावर यावर विस्तृत बोलू, असेही फडणवीसांनी सांगितले.

Mansoon Session 2021 LoP Devendra Fadnavis Press Conference criticized Thackeray Govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात