Mansoon session 2021 : प्रतिविधानसभेवर माइक काढून घेत मार्शलची कारवाई; फडणवीस म्हणाले, ही तर आणीबाणी!

Mansoon session 2021 Maha Vikas Aghadi Govt Action on Aggressive Opposition BJP MLA Started Parallel Assembly

Mansoon session 2021 : महाविकास आघाडी सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माइक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रतिविधानसभेच्या ठिकाणी मार्शल पोहाचले व त्यांनी माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. मार्शलकरवी माइक काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही आणीबाणी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mansoon session 2021 Maha Vikas Aghadi Govt Action on Agreesive Opposition BJP MLA Started Parallel Assembly


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माइक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रतिविधानसभेच्या ठिकाणी मार्शल पोहाचले व त्यांनी माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. मार्शलकरवी माइक काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही आणीबाणी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने थेट विधानसभेच्या पायरीवरच प्रतिविधानसभा भरवली. यावेळी भाजप आणि मित्रपक्षांचे सर्व आमदार हजर होते. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील तेथे हजर होते. या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना करण्यात आले. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रकार या प्रतिविधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणला आणि सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला.

भास्कर जाधवांनी दिला माइक काढून घेण्याचा आदेश!

प्रतिविधानसभेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यानंतर विखे-पाटील, जयकुमार गोयल आणि हरिभाऊ बागडे यांनीही चर्चेत भाग घेतला. चर्चा सुरू असतानाच विधानसभेतही या प्रतिविधानसभेवर मंथन सुरू झाले. सत्ताधारी आमदारांनी ही प्रतिविधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला? माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करत माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले. यावर मार्शलनी येऊन प्रतिविधानसभेतील माईक काढून घेतला.

माध्यमांना धक्काबुक्की

विधानसभा अध्यक्षांनी माइक काढून घेण्याचा आदेश दिल्यावर मार्शल विधासनभेच्या पायऱ्यांकडे आले. त्यांनी आमदारांना माईक देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश असल्याने आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं ते म्हणाले. भाजप आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. मार्शल माईक काढून घेत असताना माध्यमांचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. माध्यमांना दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

ही तर आणीबाणीच

या सर्व घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

या सरकारला आमचा डीएनए माहिती नाही

फडणवीस पुढे म्हणाले की, या सरकारला आमचा डीएनए माहिती नाही. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत, असं सांगतानाच आम्हाला विधानसभेच्या पायरीवर बसू दिले जात नसेल, तर आम्ही प्रेस रूममध्ये जाऊन प्रतिविधानसभा भरवू, असा इशारा फडणवीसांनी दिला. त्यानंतर विरोधी पक्षाने विधानसभेच्याच पायरीवर माइकशिवाय प्रतिविधानसभा भरवल

Mansoon session 2021 Maha Vikas Aghadi Govt Action on Aggressive Opposition BJP MLA Started Parallel Assembly

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण