सप्टेंबरनंतर देशात थांबल्यास याद राखा, तालिबानची नाटो सैन्याला धमकी


वृत्तसंस्था

काबूल – नियोजनानुसार सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून नाटो देशांच्या सर्वच सैन्याने मायदेशी परतावे. सप्टेंबरनंतर आमच्या देशात थांबलेल्या सैन्याला घुसखोर समजले जाईल, अशी धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेने दिली आहे. Taliban gave ultimatum to Nato

अमेरिकेमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास वीस वर्षे अमेरिका आणि नाटो देशांचे सैन्य अफगाणिस्तानात दहशतवाद्यांविरोधात लढा देत होते. मात्र, ही लढाई संपवून मायदेशी परतण्याचा निर्णय या सर्व देशांनी घेतला आहे. त्यानुसार, अल कायदा किंवा इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानात थारा न देण्याच्या अटीवर नाटो देशांनी तालिबानशी करार करत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचे ठरविले.

सैन्यमाघारीची प्रक्रियाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच तालिबान पुन्हा एकदा देशावर वर्चस्व मिळवताना दिसत आहे. या संघटनेने अनेक जिल्ह्यांवर वर्चस्व मिळविले आहे.

सैन्यमाघारीनंतरही दूतावास आणि काबूल विमानतळाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे सुमारे एक हजार सैनिक अफगाणिस्तानातच राहणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर तालिबानने हा इशारा दिला आहे.

Taliban gave ultimatum to Nato

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात