विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावे असे वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे. त्यांच्या या स्वप्नामुळे देश खूप काळ संकटात सापडला, असा आरेोप महाराष्टÑाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.Pandit Jawaharlal Nehru’s dream of becoming a peace envoy made the country weak, Governor BhagatSingh Koshyari alleges
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित अशक्य ते शक्य या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतर जण उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले, अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडल्यास देशाच्या सुरक्षेबाबत इतरांनी खूप कमी लक्ष दिले. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटायचं की शांतीदूत बनावं, कबूतरं उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली.
तो अणुबॉम्ब २० वषार्पासून तसाच ठेवला होता. सरकार घाबरायचं पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले पण अटलजींना आपल्या देशातल्या नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांदेखील सांगतो जसा आम्हाल तुमच्यावर विश्वास आहे तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्या सोबत आहे.
देशात आपल्याला शांततेचं वातावरण हवं आहे. आपण कोणालाही शत्रू मानत नाही. दुसरीकडे आपल्याला शत्रू माननाºया लोकांनी चारही बाजूंनी आपण घेरले गेलो आहोत. त्रिशूलमध्ये असताना विमानतळ सुरु नसल्याचे पाहून माज्या डोळ्यात पाणी आलं होतं.
पण कालपरवा बातमीतपत्रात पाहिलं की लडाखमध्ये ४ विमानतळं उभी राहत आहे. मला वाटलं की मला पद्मविभूषण मिळत आहे. कारण सीमेवर हे गरजेचं आहे. हे इतकं वर्ष झालं नाही पण आता मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, असेही कोश्यारी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App