अमित शहांनी केली कॉंग्रेसची पोलखोल, पंडीत नेहरू, राजीव गांधीनी गुरुदेव टागोरांच्या खुर्चीवर बसून केला होता अपमान

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेसची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलखोल केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी टागोरांच्या खुर्चीवर बसून त्यांचा अपमान केल्याचे त्यांनी सांगितले. Amit Shah insulted Congress, Pandit Nehru, Rajiv Gandhi sitting on Gurudev Tagore’s chair


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेसची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलखोल केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी टागोरांच्या खुर्चीवर बसून त्यांचा अपमान केल्याचे त्यांनी सांगितले.अमित शहा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला होता. या वेळी अमित शहा टागोर यांच्या खुर्चीवर बसले होते असा आरोप कॉंग्रेस संसदीय दलाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता.

यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, बंगाल दौऱ्यात मी कधीही टागोरांच्या खुर्चीवर बसलो नाही. चौधरी यांचे आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यामुळे लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकायला हवेत. अमित शहा म्हणाले की, चौधरी यांच्या आरोपांसाठी मी त्यांना दोष देणार नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या पक्षाची पार्श्वभूमीच तशी आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून ही चूक झाली. माझ्याकडे दोन फोटो आहेत. एका फोटोमध्ये पंडीत नेहरू हे टागोरांच्या खुर्चीवर बसले आहेत. दुसऱ्या फोटोत तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी हे टागोर यांच्या सोफ्यावर बसले आहेत.

शहा म्हणाले या दोन्ही गोष्टींचा उल्लेख मी करू इच्छित नव्हतो. परंतु, लोकसभेच्या कामकाजात चुकीच्या गोष्टी जाऊ नयेत यासाठीच मी बोलत आहे. माझ्याकडे विश्वभारतीच्या कुलगुरूंचे पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की माझ्याकडून अशी घटना घडलेली नाही. विश्वभारतीमधील टागोरांच्या दालनात एक खिडकी आहे. त्याठिकाणी भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. माझा फोटो हा तेथीलच आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका असल्याने सध्या अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येथे येत आहेत. अमित शहा तेथे आल्यावर टागोरांच्या खुर्चीवर बसले, त्यामुळे टागोरांचा अपमान झाला. वास्तवात मात्र चौधरी यांचा आरोप तथ्यहीन असल्याचे राज्यसभेत सिद्ध झाले. उलट चौधरींच्या दिवंगत कॉंग्रेस नेत्यांनीच टागोर यांचा अवमान केल्याची वस्तुस्थिती उजेडात आली.

Amit Shah insulted Congress, Pandit Nehru, Rajiv Gandhi sitting on Gurudev Tagore’s chair

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*