मुंबईकरांना रोज प्रश्न पडतात, ते विचारतच राहू, आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंवर पलटवार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही? असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.Mumbaikars get questions every day, keep asking, Ashish Shelar retaliates against Uddhav Thackeray

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असे ठाकरे यांनी म्हटले होते. आशिष शेलारांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का?, गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?, 114 टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?,



मुंबई पालिका वषार्ला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?, मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?’

परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? असा सवाल करत शेलार यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. त्यांनी विचारले आहे की, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?, मुंबईत गेल्या 11 वर्षात 40 हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली,

मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?, मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?, मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?

Mumbaikars get questions every day, keep asking, Ashish Shelar retaliates against Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात