मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर उपचार सुरू, निधनाचे खोटे वृत्त देणाऱ्यांची काढली खरडपट्टी, म्हणाल्या – मैं अभी जिंदा हूँ !

Mumbai Mayor Kishori Pednekar rubbishes report of her death, says I am very much alive and taking treatment

Mumbai Mayor Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापौर कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, इंडिया टुडेने मात्र थेट त्यांच्या निधनाचे वृत्त चालवल्याने त्यांनी ट्विटरवर चांगलीच खरडपट्टी काढली आहे. Mumbai Mayor Kishori Pednekar rubbishes report of her death, says I am very much alive and taking treatment


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापौर कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, इंडिया टुडेने मात्र थेट त्यांच्या निधनाचे वृत्त चालवल्याने त्यांनी ट्विटरवर चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

इंडिया टुडेच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत महापौर पेडणेकर म्हणाल्या की, डियर इंडिया टुडे मी अजून जिवंत आहे. आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. काही वेळापूर्वीच मी डाळ खिचडीसुद्धा खाल्ली आहे. मला वाटते की एक प्रमुख मीडिया समूह म्हणून तुम्ही सर्व बेसिक पत्रकारितेच्या सिद्धांतांशी अवगत असाल, कृपया अशा बातम्या पडताळल्याचे कष्ट घ्या. एवढीच कमीत कमी अपेक्षा आहे.”

काल (शनिवारी) रात्री पासून किशोरी पेडणेकरांना त्रास होत होता. छातीतील वेदना वाढू लागल्याने त्यांना आज (रविवारी) ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच अनेक वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास आहे आणि त्यांना कधी सुटी होईल याविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये भिंत कोसळल्याने आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. महापौर पेडणेकरांनी प्रकृती अस्वास्थ असतानाही या घटनांचा आढावा घेतला होता. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. या दुर्घटनांबद्दल त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

सर्वात सक्रिय नगराध्यक्ष म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. कोविड संकटाच्या वेळी, त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. त्या स्वत:सुद्धा परिचारिका राहिलेल्या आहेत. म्हणूनच त्यांनी कोविड काळात सेवा करण्याची तयारी दर्शविली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी ट्विटरवर सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Mumbai Mayor Kishori Pednekar rubbishes report of her death, says I am very much alive and taking treatment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण