Inspiring : मुलगा केंद्रात मंत्री, तरीही आईवडील करतात शेतात मजुरी, म्हणाले- मुलाचा अभिमान, पण स्वाभिमानही शाबूत!

son Became minister Modi Govt, yet parents work in the fields, inspiring story of L Murugans Farmer father and mother

inspiring story of L Murugans Farmer father and mother : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष एल. मुरुगन यांनाही राज्यमंत्री करण्यात आले आहे. 44 वर्षीय के. मुरुगन कठोर मेहनतीनंतर दिल्लीला गेले आहेत. परंतु सध्या त्यांच्या आईवडिलांच्या साधेपणाचीच चर्चा देशभरात होत आहे. son Became minister Modi Govt, yet parents work in the fields, inspiring story of L Murugans Farmer father and mother


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष एल. मुरुगन यांनाही राज्यमंत्री करण्यात आले आहे. 44 वर्षीय के. मुरुगन कठोर मेहनतीनंतर दिल्लीला गेले आहेत. परंतु सध्या त्यांच्या आईवडिलांच्या साधेपणाचीच चर्चा देशभरात होत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांचे आईवडील राजकारणाच्या लखलखाटापासून दूर असलेल्या तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील कोन्नूर गावात मजूर म्हणून काम करतात. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मुरुगन माध्यमे जेव्हा त्यांच्या घरी गेली, तेव्हा त्यांचे आईवडील दिल्लीपासून सुमारे 2500 किमी अंतरावर असलेल्या नामक्कलमधील कोन्नूर गावात शेतात राबत होते. आई एल. वरुदम्मल (वय 59) भरउन्हात शेतातून तण काढत होत्या. त्यांचा सर्वसाधारण शेतकरी महिलेचाच पेहराव होता. तर जवळच्या शेतात 68 वर्षांचे वडील लोगनाथन जमीन सपाट करण्याच्या कामात गुंतले होते. या दोघांना पाहून ते एका केंद्रीय मंत्र्याचे आईवडील आहेत, असेच कुणीच म्हणणार नाही. या दोघांशी बोलण्यासाठी माध्यमांना शेताच्या मालकाची परवानगी घ्यावी लागली.

मुलाचा अभिमान, पण कष्टाची भाकर प्रिय

मुलगा एल. मुरुगन हे मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले आहेत, परंतु आईवडील अजूनही शेतात घाम गाळत आहेत. एल. मुरुगन दलित असून ते अरुणथातियार समाजातील आहे. गावात त्यांचे छोटेसे घर आहे. आईवडील जेव्हा-जेव्हा काम मिळेल तेव्हा ते करतात. कधी-कधी शेतात मजुरी, तर कधी ओझे वाहण्याचे काम करतात. त्यांना त्यांचा मुलगा मंत्री झाल्याची बातमी शेजार्‍यांकडून समजली, तेव्हाहवी ते दोघे शेतातच काम करत होते. मुलगा मंत्री झाल्याची बातमी ऐकल्यानंतरही दोघे थांबले नाहीत, त्यांनी काम सुरूच ठेवले. आपल्या मुलाच्या यशाचा त्यांना अभिमान आहे, परंतु त्या दोघांनाही हे वेगळे आयुष्य आवडते, त्यांना घाम गाळून कष्टाची भाकर जास्त भावते.

कर्ज काढून केले मुलाचे शिक्षण

केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. सुरुवातीला सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुरुगन यांनी चेन्नईच्या आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांना कर्ज काढावे लागले. भाजपच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष बनल्यानंतर मुरुगन यांनी आपल्या पालकांना चेन्नईत राहण्यास सांगितले होते, परंतु काही दिवसांनी ते परत आले. मुरुगन यांच्या आई म्हणाल्या, “आम्ही कधीकधी चेन्नईला तीन-चार दिवसांसाठी जात होतो, पण मुलाच्या व्यग्रतेमुळे आम्ही पुन्हा गेलो नाही. आम्ही पुन्हा आमच्या गावी कोन्नूरला परत आलो.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर एल. मुरुगन यांनी आपल्या आईवडिलांनी फोन केला होता. त्यानंतर या दोघांनीही त्यांना विचारले होते की, त्यांचे सध्याचे पद तमिळनाडूच्या भाजपा युनिट अध्यक्षपदापेक्षा मोठे आहे का? मुरुगन यांचे आई-वडील म्हणतात, ‘आमचा मुलगा मोठ्या पदावर गेला आहे. आईवडील म्हणून आम्ही धन्य झालो आहोत.

मुरुगन यांच्याकडे दोन मंत्रालयांचा कार्यभार

केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्याकडे केंद्रात मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आहे. दोन्ही विभागांत त्यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. मुरुगन यांनी नवीन सदस्यांसह 7 जुलै रोजी शपथ घेतली. यावर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, पण द्रमुकच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता.

son Became minister Modi Govt, yet parents work in the fields, inspiring story of L Murugans Farmer father and mother

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात