Mayawati BSP Bhrahmin Sammelan Stratergy in UP To Win UP Elections 2022

यूपीमध्ये ब्राह्मण संमेलने भरवून मायावतींचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न, 2007ची पुनरावृत्ती होईल?

UP Elections 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मायावतींनी पुन्हा एकदा राज्यात ब्राह्मणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच भाग म्हणून ब्राह्मण अधिवेशन आयोजित केले आहे. याची जबाबदारी सतीशचंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे. Mayawati BSP Brahmin Sammelan Strategy in UP To Win UP Elections 2022


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मायावतींनी पुन्हा एकदा राज्यात ब्राह्मणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच भाग म्हणून ब्राह्मण अधिवेशन आयोजित केले आहे. याची जबाबदारी सतीशचंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे.

बसपाचे ब्राह्मण अधिवेशन येत्या 23 जुलैपासून अयोध्येतून सुरू होईल. 23 जुलै रोजी सतीशचंद्र मिश्रा अयोध्येत ब्राह्मणांना मंदिर दर्शनांच्या माध्यमातून जोडण्याची कसरत सुरू करतील. पहिल्या टप्प्यात 23 जुलै ते 29 जुलै या कालावधीत सलग सहा जिल्ह्यांत ब्राह्मण संमेलने घेण्यात येतील. सतीशचंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात ही जिल्हास्तरीय संमेलने होणार आहेत.

2007च्या निवडणूक प्रचाराच्या धर्तीवर बसपचे ब्राह्मण अधिवेशन होईल. शुक्रवारी राज्यभरातून 200 हून अधिक ब्राह्मण नेते आणि कार्यकर्ते लखनऊमधील बसप कार्यालयात पोहोचले होते, तेथे पुढील रणनीतीवर चर्चा झाली. बसप 2007 च्या फॉर्म्युल्यावर परत नशीब आजमावू पाहत आहे. दलित, ब्राह्मण, ओबीसी या फॉर्म्युल्यावर मायावती 2022च्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 2007 मध्ये मायावतींनी मोठ्या संख्येने ब्राह्मणांना निवडणूक रिंगणात तिकीट देऊन मैदानात उतरवले होते. मायावतींची ही रणनीती यशस्वीही ठरली आणि बसपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले होते.

मायावतींनी 2007च्या यूपी निवडणुकीत 403 पैकी 206 जागा जिंकून 30 टक्के मते मिळवत सत्ता काबीत केली होती. त्याच्या या विजयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. बसपाची 2007ची कामगिरी अपघाती नव्हती, त्यामागे मायावतींची विचारपूर्वक ठरवलेली रणनीती होती. निवडणुकीच्या जवळपास एक वर्ष आधी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त ओबीसी, दलित, ब्राह्मण आणि मुस्लिम यांच्यासमवेत एक ताळमेळ तयार करण्यात आला. आताही हेच सूत्र परत आजमावण्याचा प्रयत्न बसपा करत आहे.

Mayawati BSP Brahmin Sammelan Strategy in UP To Win UP Elections 2022

महत्त्वाच्या बातम्या