Mumbai Landslide : चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त करत मदतीची घोषणा

PM Modi Expressed Grief in Mumbai Chembur and vikhroli landslide incident, announced Help

Mumbai Chembur and vikhroli landslide : मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसाने चेंबूर भागात रविवारी सकाळी काही घरांवर संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, विक्रोळीमध्येही एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनांवर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त करत पीडित कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. PM Modi Expressed Grief in Mumbai Chembur and vikhroli landslide incident, announced Help


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसाने चेंबूर भागात रविवारी सकाळी काही घरांवर संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, विक्रोळीमध्येही एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनांवर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त करत पीडित कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याने दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबासोबत आहेत. यात जे लोक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.’ यावेळी त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात दुर्घटना

मुसळधार पावसात चेंबूरमधील वाशीनाका परिसरात असलेल्या भारतनगर बीएआरसी संरक्षक भिंत कोसळली. शेजारी असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळून 17 जण ठार झाले आहेत. तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत 17 जणांचा हकनाक बळी गेला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

विक्रोळीतील दुर्घटना

विक्रोळीतील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या सूर्यानगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकून आतापर्यंत 5 जणांनी प्राण गमावले असून एनडीआरएफच्या पथकाच्या मते आणखी पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

PM Modi Expressed Grief in Mumbai Chembur and vikhroli landslide incident, announced Help

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात