Aurangabad BJP leader Sanjay Kenekar who died in an accident by avoiding birthday expenses, handing over a check of one lakh

संभाजीनगर भाजप अध्यक्ष केणेकरांची स्तुत्य कृती : वाढदिवसाचा खर्च टाळून अपघाती निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत

Aurangabad BJP : महिनाभरापूर्वी पडेगाव परिसरातील अपघातात निधन झालेले भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजू बनकर यांच्या कुटुंबीयांना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून एक लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश शनिवारी (दि. 16) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या उपस्थितीत बनकर यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. Aurangabad BJP leader Sanjay Kenekar Helped Party Worker Family who died in an accident, handing over a check of one lakh


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी पडेगाव परिसरातील अपघातात निधन झालेले भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजू बनकर यांच्या कुटुंबीयांना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून एक लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश शनिवारी (दि. 16) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या उपस्थितीत बनकर यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून, कोणतेही पुष्पगुच्छ न स्वीकारता बनकर कुटुंबीयांना मदत केली. कार्यकर्ता पक्षासाठी खस्ता खातो, जिवाचे रान करतो, तद्वतच कार्यकर्त्याच्या कुटुंबासोबत पक्षही खंबीरपणे उभा आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ते आणि कुटुंबीय महत्त्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संजय केणेकर

बनकर कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देताना विधानस परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सविता कुलकर्णी, शालिनी बुंदे, माधुरी अदवंत, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, दीपक ढाकणे, समीर राजूरकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, बबन नरवडे, विशाल गंगवानी आदी उपस्थित होते.

Aurangabad BJP leader Sanjay Kenekar Helped Party Worker Family who died in an accident, handing over a check of one lakh

महत्त्वाच्या बातम्या