News Click website Controversy : देशाविरुद्ध कट रचण्यासाठी न्यूज पोर्टलला थेट चीनमधून 38 कोटींची फंडिंग, ईडीने आवळला फास

News Click website Controversy ED probes media portal’s funding from businessman linked to China regime

News Click website Controversy :  अंमलबजावणी संचालनालयाला (ED) न्यूज पोर्टल ‘Newsclick’विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातील चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या न्यूज पोर्टल आणि याच्या प्रोमोटर्सनी मूळच्या श्रीलंका-क्यूबातील एक व्यावसायिक नेविले रॉय सिंघम यांच्याशी एक करार केला होता, जो संशयाच्या भोवऱ्यात आहे. PPK Newsclick Studio Pvt Ltd ला जी 38 कोटी रुपयांची मोठी फंडिंग मिळाली होती, त्याचा मुख्य स्रोत याच व्यावसायिकाचा मानला जात आहे. या व्यावसायिकाचा थेट चीनशी संबंध आहे. News Click website Controversy ED probes media portal’s funding from businessman linked to China regime


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाला (ED) न्यूज पोर्टल ‘Newsclick’विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातील चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या न्यूज पोर्टल आणि याच्या प्रोमोटर्सनी मूळच्या श्रीलंका-क्यूबातील एक व्यावसायिक नेविले रॉय सिंघम यांच्याशी एक करार केला होता, जो संशयाच्या भोवऱ्यात आहे. PPK Newsclick Studio Pvt Ltd ला जी 38 कोटी रुपयांची मोठी फंडिंग मिळाली होती, त्याचा मुख्य स्रोत याच व्यावसायिकाचा मानला जात आहे. या व्यावसायिकाचा थेट चीनशी संबंध आहे.

व्यावसायिकाचे चिनी सत्ताधाऱ्यांशी संबंध?

वेबसाइटला ही रक्कम 2018 ते 2021 मध्ये परदेशातून पाठवण्यात आली होती. TOIच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या EDच्या सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे की, व्यावसायिक नेविलेचा संबंध चीनची सत्ताधारी पार्टी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना (CPC)’च्या एका प्रोपगेंडा संघटनेशी आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराशीही या न्यूज पोर्टलच्या तारा जुळलेल्या आहेत, कारण यांना जी रक्कम मिळाली, त्याचा काही हिस्सा तथाकथित अॅक्टिव्हिस्ट्सना देण्यात आला होता.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराशीही संबंध?

यात ‘एल्गार परिषद’चे गौतम नवलखा यांचेही नाव सामील आहे, जे सध्या तुरुंगात आहेत. न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थाशी संबंधांवरून EDने तुरुंगातच गौतम नवलखा यांना चौकशी केली आहे. वेबसाइटला जी रक्कम मिळाली, त्याच्या एका मोठ्या हिश्शाला त्यांनी ‘सेवांची निर्यात (Export Of Services)’च्या रूपात दाखवले आहे. पुरकायस्था यांनी सिंघम यांच्या CPCशी संबंध असणे वा स्वत:च्या पोर्टलचे चिनी सरकारशी संबंध असल्याचे नाकारले आहे.

काय म्हणाले न्यूज पोर्टलचे संपादक

ते म्हणाले की, सिंघम एक अमेरिकी व्यावसायिक आहेत, जे एक सॉफ्टवेअर कंपनी चालवत होते. त्यांनी त्या कंपनीला 700 ते 800 मिलियन डॉलर (साडेपाचशे कोटींहून जास्त) मध्ये विकले होते. त्यांनी दावा केला की, त्यांना जे काही फंड्स मिळाले आहेत, ते अमेरिकेची सुप्रसिद्ध संस्थांमधून प्राप्त झाले आहेत. सोबतच त्यांनी याप्रकरणी RBIच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचाही दावा केला.

ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

तर EDच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, Newsclickला अमेरिकेच्या ‘जस्टिस एंड एजुकेशन फंड्स इंक’, ‘GSPAN LLC’ आणि ‘ट्राइकनटिनेंटल लिमिटेड इंक’मधून फंड्स मिळाले. विशेष बाब म्हणजे या सर्व कंपन्यांचा पत्ता एकच आहे. याच्या शिवाय बाझीलच्या ‘सेंट्रो पॉपुलर डेमिदास’मधूनही फंड्स मिळाले आहेत. ED ने नुकतेच ‘Newsclick’च्या शेअर होल्डर्सच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यात CPCशी संबंधित अनेक ईमेल त्यांच्या हाती लागले होते.

News Click website Controversy ED probes media portal’s funding from businessman linked to China regime

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात