up election 2022 priyanka gandhi reaction on congress alliance

UP Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचे मोठे संकेत, म्हणाल्या- आघाडीला नकार नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ!

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस एकट्याने उतरणार की आघाडी करणार, याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोठे संकेत दिले आहेत. प्रियांका गांधी म्हणाल्या की, यावर आताच काही बोलणे घाईचे ठरेल. कॉंग्रेसने आघाडी करणार ही बाब त्यांनी नाकारली नाही. प्रियांका म्हणाल्या की, पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. up election 2022 priyanka gandhi reaction on congress alliance


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस एकट्याने उतरणार की आघाडी करणार, याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोठे संकेत दिले आहेत. प्रियांका गांधी म्हणाल्या की, यावर आताच काही बोलणे घाईचे ठरेल. कॉंग्रेसने आघाडी करणार ही बाब त्यांनी नाकारली नाही. प्रियांका म्हणाल्या की, पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आघाडीच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या, ‘आगामी निवडणुकांबाबत आमचा विचार व्यापक आहे. यावर आताच काही बोलणं खूप घाईचे ठरेल. या निवडणुकीत आम्ही युती करणार किंवा नाही, हे मी नाकारत नाही, पण याबद्दल काहीही बोलणे खूप घाईचे आहे.

कॉंग्रेसच्या हिताची काळजी घेऊनच निर्णय

प्रियांका गांधी म्हणाल्या की, कॉंग्रेस पुढील परिस्थितीनुसार रणनीती ठरवेल. आमच्या संघटनेला आणि पक्षाच्या हिताला इजा होईल असे आम्ही काहीही करणार नाही. त्या म्हणाल्या की, यूपीमध्ये त्यांच्याकडे मजबूत संघटन आहे, ते प्रत्येक पातळीवर अधिक मजबूत केले जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेस उत्तर प्रदेशात आघाडीच्या शक्यता शोधत असल्याची चर्चा आहे. यामध्ये समाजवादी पक्षासह अन्य लहान पक्षांच्या पर्यायांवरही विचार केला जात आहे. आघाडीचा सल्ला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसला दिला असल्याचेही बोलले जात आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने आघाडी केली होती. या आघाडीत त्यांना केवळ 54 जागा जिंकता आल्या.

up election 2022 priyanka gandhi reaction on congress alliance

महत्त्वाच्या बातम्या