कोल्हापुरात पोलीस आणि मराठा आंदोलकांत झटापट, अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं

Maratha Reservation Agitation in Kolhapur showing black flags to deputy cm Ajit Pawar

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. 14 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवले. हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला. Maratha Reseveration Agitation in Kolhapur showing black flags to deputy cm Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. 14 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवले. हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला.

यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावर अक्षरश: हातांनी बडवून दरवाजा पोलिसांना उघडण्यास भाग पाडला. यावेळी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आणि पोलिसांत यावेळेस जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यानंतर आंदोलक रस्त्यावरती ठाण मांडून होते. तसेच राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तिपत्र देण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईसाठी त्यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Maratha Reservation Agitation in Kolhapur showing black flags to deputy cm Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात