NSDL Freezes Three FPI Accounts Owning Adani Group : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. या फंडांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43,500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. share market big news nsdl freezes three fpi accounts owning adani group shares fall
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. या फंडांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43,500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
एनएसडीएलने अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंडची खाती गोठविली आहेत. डिपॉझिटरीच्या वेबसाइटनुसार, ही खाती 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी गोठविली गेली आहेत.
या वृत्तामुळे आज अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग कोसळले. अदानी एन्टरप्राइजेसचा समभाग 15 टक्क्यांनी घसरून 1361.25 रुपये झाला. अदानी पोर्ट्स आणि इकोनॉमिक झोन 14 टक्क्यांनी, अदानी पॉवर 5 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशन 5 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी 5 टक्क्यांनी, अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांनी घसरला.
आतापर्यंत अदानी समूहाकडून यासंदर्भात कोणतेही निवेदन आलेले नाही. हे तिन्ही फंड मॉरिशसचे असून सेबीकडे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) म्हणून नोंदणीकृत आहेत. तिन्ही मिळून अदानी एंटरप्रायझेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के हिस्सा आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मालकीबाबत पुरेशी माहिती न दिल्याने ही कारवाई केली गेली आहे. खाते गोठवण्याचा अर्थ असा आहे की हे फंड यापुढे त्यांच्या खात्यातील शेअर्स विकू शकणार नाहीत किंवा नवीन शेअर्स खरेदी करू शकणार नाहीत.
परदेशी गुंतवणूकदारांना हाताळणाऱ्या डिपॉझिटरीने म्हटले की, मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत या खात्यांमधून मालकीबद्दल पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई करण्यापूर्वी कंपनी त्यांच्या ग्राहकांना सहसा नोटीस देतात, परंतु जर फंडकडून प्रतिसाद मिळाला नसेल तर खाते गोठवण्यासारखी कठोर कारवाई केली जाते.
share market big news nsdl freezes three fpi accounts owning adani group shares fall
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App