या वर्षी दही हंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार की नाही? मुख्यमंत्री ठाकरे आज निर्णय घेण्याची शक्यता

Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a key meeting with Dahi Handi Committee in Mumbai today

Dahi Handi : कृष्ण जन्माष्टमीचा सण मुंबईसह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण या सणाचा उत्साह सर्वात जास्त मुंबईकरांमध्ये दिसून येतो. दरवर्षी या सणानिमित्त विशेष देखावे काढले जातात तसेच दही हंडीचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात येत असते. तथापि, गतवर्षी कोरोनामुळे दही हंडी उत्सव साजरा होऊ जाऊ शकला नव्हता. Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a key meeting with Dahi Handi Committee in Mumbai today


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कृष्ण जन्माष्टमीचा सण मुंबईसह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण या सणाचा उत्साह सर्वात जास्त मुंबईकरांमध्ये दिसून येतो. दरवर्षी या सणानिमित्त विशेष देखावे काढले जातात तसेच दही हंडीचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात येत असते. तथापि, गतवर्षी कोरोनामुळे दही हंडी उत्सव साजरा होऊ जाऊ शकला नव्हता.

यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शहरातील सर्व दही हंडी समित्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या वेळी दहीहंडी धूमधडाक्यात साजरी करता येईल की नाही यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील दही हंडी मंडळांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. दही हंडी समित्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन केले होते की, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून छोट्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी द्यावी. यासंदर्भातील अंतिम निर्णय आज होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a key meeting with Dahi Handi Committee in Mumbai today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात