अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग

Up deputy cm announced ayodhya and other cities road will be name of kalyan singh

road will be name of kalyan singh : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. परंतु राममंदिर चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना कायम आठवले जाईल. यूपी सरकारने आता एक मोठी घोषणा करत म्हटले की, राज्यातील 5 जिल्ह्यांतील एका रस्त्याचे नाव माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहांच्या नावे असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव ‘कल्याण सिंह मार्ग’ ठेवण्याची घोषणा केली आहे. अयोध्येबरोबरच लखनऊ, प्रयागराज, बुलंदशहर आणि अलिगडमधील प्रत्येकी एका रस्त्याला कल्याण सिंह यांचे नाव दिले जाईल. Up deputy cm announced ayodhya and other cities road will be name of kalyan singh


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. परंतु राममंदिर चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना कायम आठवले जाईल. यूपी सरकारने आता एक मोठी घोषणा करत म्हटले की, राज्यातील 5 जिल्ह्यांतील एका रस्त्याचे नाव माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहांच्या नावे असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव ‘कल्याण सिंह मार्ग’ ठेवण्याची घोषणा केली आहे. अयोध्येबरोबरच लखनऊ, प्रयागराज, बुलंदशहर आणि अलिगडमधील प्रत्येकी एका रस्त्याला कल्याण सिंह यांचे नाव दिले जाईल.

राम मंदिर चळवळीतील कल्याण सिंह यांचे योगदान जगजाहीर आहे. मंदिर आंदोलनात त्यांचे योगदान पाहता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दिवंगत कल्याण सिंह यांनी राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. आता सरकारने त्यांच्या योगदानासाठी त्यांना विशेष आदर दिला आहे. यूपीमधील 5 जिल्ह्यांच्या रस्त्यांची नावे आता त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहेत. यूपीचे अनेक रस्ते आता कल्याण सिंह मार्ग म्हणून ओळखले जातील.

बाबरी विध्वंसाची जबाबदारी घेऊन दिला राजीनामा

सर्वांना माहिती आहे की, 9 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती. कार सेवकांनी हे बांधकाम पाडले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. बाबरी पाडल्याची जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना होती. यासोबतच राम भक्त कल्याण सिंह यांनी अयोध्येतील कार सेवकांवर गोळीबार न करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

तत्कालीन राज्यपाल सत्यनारायण रेड्डीसुद्धा सरकारच्या बरखास्त करावे की राजीनामा स्वीकारावा, अशा द्विधा मन:स्थितीत होते. याप्रकरणी कल्याण सिंह स्वतः राजभवनात पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

कल्याण सिंह हिंदुत्वाच्या राजकारणाचा मोठा चेहरा

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून बाहेर पडताच कल्याण सिंह हिंदुत्वाच्या राजकारणाचा एक मोठा चेहरा म्हणून उदयास आले. विशेष म्हणजे आयुष्यभर त्यांनी बाबरी पाडल्याच्या घटनेबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही. त्याने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, या घटनेबद्दल त्यांना कोणताही खेद नाही. त्यांनी 6 डिसेंबर 1992 हा दिवस राष्ट्रीय अभिमानाचा असल्याचे म्हटले होते.

Up deputy cm announced ayodhya and other cities road will be name of kalyan singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात