मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस डॉक्टरांचा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता एचएन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वृत्तसंस्थेनुसार, रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई यांनी त्यांना पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पर्यावरण मंत्री व सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. Maharashtra CM Uddhav Thackeray has been discharged from Sir HN Reliance Hospital today


वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता एचएन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वृत्तसंस्थेनुसार, रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई यांनी त्यांना पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पर्यावरण मंत्री व सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

मणका व मानदुखीच्या त्रासानंतर दि. 22 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या एचएन रुग्णालयात त्यांच्या स्पायनल सर्जरी करण्यात आली होती. रुग्णालयाचे डॉ. शेखर भोजरात व डॉ. अजित देसाई यांनी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. आज सकाळी त्यांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे.

मानदुखीचा त्रास असतानाही त्यांनी राज्यातील व केंद्रातील काही बैठकांना ऑनलाइन हजेरी लावली होती. रुग्णालयात असतानाही त्यांनी काम सुरूच ठेवले. नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. तथापि, शिवसेना नेते संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ममतांनी मुख्यमंत्री ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांनी अधिक जोमाने काम करावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

Maharashtra CM Uddhav Thackeray has been discharged from Sir HN Reliance Hospital today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात