वृत्तसंस्था
पुणे : ‘आमच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे परत घ्या’, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी आगळेवेगळे आंदोलन केले.Kindly take the money which is deposited in our Accounts, Women’s urged to Goverment
वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले हे पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी हडपसर येथील महिलांनी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही चक्रावले.
कोरोनाने गांजलेल्या, टाळेबंदीने पिडलेल्या आणि रोजगार गमावलेल्या आणि सध्या स्वयंसेवी संस्थेच्या असल्याचे सांगून तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार , गृहसेविका, कष्टकरी महिलांना गाठून सरकारच्या योजनेतून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले.
त्यासाठी आधारकार्ड, छायाचित्र, शिधापत्रिका आणि बँकेचे पासबूक द्या. काही दिवसातच जमा झालेल्या रकमेतील निम्मे आम्हाला परत करावे लागतील, असे या महिलांना सांगण्यात आले.
अल्पशिक्षित, निरक्षर महिलांनी कागदपत्रे संस्थेच्या महिलांच्या हवाली केली. २३ एप्रिल रोजी काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर संस्थेच्या महिलांनी त्यांच्याकडे निम्मी रक्कम मागण्यास सुरुवात केली.
दरम्यान, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाल्याचे या कष्टकरी महिलांना समजले. त्याबाबतची माहिती घेतल्यानंतर तसा प्रकार झाल्याची कष्टकरी महिलांची खात्री झाली.
त्यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने केली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांना त्यांनी मागणीचे निवेदन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App