रिलायन्स इंडस्ट्रीजला यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा


मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात १३,२२७ कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याच काळात ६,३४८ कोटी नफा झाला होता.Reliance Industries reported double profit in the first quarter of this year


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात १३,२२७ कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याच काळात ६,३४८ कोटी नफा झाला होता.



टेलीकॉम, किरकोळ व्यापार आणि तेलउद्योगाचा या नफ्यामध्ये मोठा वाटा आहे. यंदाच्या वर्षी तेलउद्योगातून रिलायन्सला जास्त फायदा झाला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल कमी झाला होता.

याचे कारण म्हणजे कंपनीचा एकूण आर्थिक व्यवहार ५.९८ ट्रिलीयनवरून ४.६ ट्रिलीयनवर घसरला होता. ही घसरण मुख्यत: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये झालेली होती. कंपनीचा एकूण नफा ४९,१२८ कोटी रुपये आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा २४.८ टक्यांनी वाढ झाली आहे.

Reliance Industries reported double profit in the first quarter of this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात