मुंबईच्या ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास जोरात , ‘या ‘ तीन राज्यातील एनसीबीचे अधिकारी झाले मुंबईत दाखल


मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे सोबतच एनसीबी देखील या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.दरम्यान अनेक राज्यातून या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.Investigations into Mumbai’s drug party case are in full swing, NCB officers from these three states have arrived in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणावरुन गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. अमली पदार्थ नियंत्रण कक्षानं (NCB) ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोघांना कोर्टानं ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

क्रूझ शिप पार्टी प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले की , पार्टीसाठी जहाजाला कोणती परवानगी देण्यात आली याबद्दल मुंबई पोलीस डीजी शिपिंग आणि एमबीपीटीशी बोलणार आहेत. सध्या राज्यात कोव्हिड -१९ मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कलम १८८ चे कोणते उल्लंघन झालं आहे याचाही तपास करण्यात येणार आहे.



तसेच कलम १४४ नुसार ५ लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते या पार्टीसाठी परवानगी घेतली आहे की नाही किंवा कुठल्या एजन्सीजने परवानगी दिली आहे का? याचा तपास करणार आहे. तसेच नियमांमध्ये काही उल्लंघन झालं असेल तर मुंबई पोलीस एफआयआर दाखल करणार आहेत.

गुजरात , मध्य प्रदेश , दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे सोबतच एनसीबी देखील या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.दरम्यान अनेक राज्यातून या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरात , मध्य प्रदेश , दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई झोनल ऑफिसमधील अधिकारी संख्येने कमी आहेत. याचमुळे इतर राज्यातून अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

Investigations into Mumbai’s drug party case are in full swing, NCB officers from these three states have arrived in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात