Aryan Khan Drug Case : क्रूझच्या सीईओला एनसीबीचे पुन्हा समन्स, चौकशीत आर्यन खान म्हणाला – पप्पांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते


 

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझचे सीईओ जर्गन बेलोम यांना एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखी लोक आहेत जे ड्रग्ज घेत होते.Aryan Khan Drug Case NCB again summoned the CEO of Cruise, Aryan said in interrogation I Have to take appointment to meet my father


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझचे सीईओ जर्गन बेलोम यांना एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखी लोक आहेत जे ड्रग्ज घेत होते.

न्यायालयाने सोमवारी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीजासह इतर पाच आरोपी विक्रांत चोकर, इशमित सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यापूर्वीच क्रूझवर माहिती देणारे तैनात होते. या खबऱ्यांनी फोटोंद्वारे आर्यन आणि त्याचे मित्र आल्यावर तत्काळ माहिती दिली. आता NCBने क्रूझशी संबंधित अधिकाऱ्यांकडून 2 ऑक्टोबर म्हणजेच छाप्याच्या दिवशी क्रूझचा मॅनिफेस्टो मागवला आहे. यात जहाजात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, खोलीचा क्रमांक, त्यांच्या आय-कार्डचा तपशील आणि मोबाइल क्रमांकासह उपलब्ध असेल. क्रूझचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले आहे.



आर्यन खानची चौकशी सुरू

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशीदरम्यान सांगितले की, शाहरुख खान सध्या तीन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो त्याच्या पठाण चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे, त्याला अनेक तास मेकअप करावा लागतो. आर्यन म्हणाला की माझे वडील इतके व्यग्र आहेत की मला त्यांची मॅनेजर पूजाकडून त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागेल. मी अपॉइंटमेंट घेऊनच पप्पांना भेटू शकतो.

आर्यनने सांगितले की, त्याने चित्रपट निर्मितीचा अभ्यासक्रम केला आहे आणि परदेशात शिक्षण घेतले आहे. आर्यनने कोर्टाकडे नेझल ड्रॉपची मागणी केली होती, जी एनसीबीने दिली आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यननेही त्याच्या हाताने सुमारे 4 पानांचे स्टेटमेंट लिहून अधिकाऱ्यांना दिले आहे. न्यायालयातही आर्यनचे वकील मानेशिंदे यांनी त्यांच्या वतीने निवेदन वाचले होते. यामध्ये आर्यन म्हणाला होता – मी हक्काची बाब म्हणून जामीन मागत नाही. सत्य हे आहे की मला (क्लायंट अर्थात आर्यन) क्रूझवर ताब्यात घेण्यात आले नाही. मला तिथे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आणि मी एका मित्रासह तिथे गेलो होतो. क्रूझवर मला कोणत्या केबिनचे वाटप करण्यात आले, हे मला माहिती नाही.

आर्यन म्हणाला – क्रूझवर जाण्यासाठी बोर्डिंग पास खरेदी केला नाही

आर्यनने असा दावा केला आहे की, त्याने क्रूझवर जाण्यासाठी एक पैसाही दिला नाही किंवा त्याने कोणत्याही आयोजकाला आधीपासून ओळखत असल्याचे कबूल केले नाही. निवेदनानुसार, आर्यनकडून प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली नाहीत. त्याच्याकडे 6 ग्रॅम चरस असल्यामुळे मित्राला अटक करण्यात आली. तथापि, एनडीपीसी 8 सी, 20 बी, 27 आणि 35 चे कलम आर्यन खानवर लादण्यात आले आहेत. याअंतर्गत ड्रग्जचे सेवन, जाणूनबुजून ड्रग्ज घेणे आणि खरेदी करणे यासारखी कृत्ये येतात.

Aryan Khan Drug Case NCB again summoned the CEO of Cruise, Aryan said in interrogation I Have to take appointment to meet my father

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात