राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण; दुपारपर्यंत उकाडा , सायंकाळी बरसणार


वृत्तसंस्था

पुणे : राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण राहणार आहे. कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. In state for week a There Is Rainy climet

काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर ढग दाटून येतील. त्यामुळे तापमान वाढून उकड्याचा त्रास होईल. आठवडाभर असे वातावरण राहणार आहे. कधी कधी अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता सायंकाळी निर्माण होऊ शकते.राज्यात यापूर्वी अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वीज पडून दहा जण दगावले होते. गारपिटीचा तडाखा बसला आणि त्याचा परिणाम पिकांवर झाला होता.

कोकण विभागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

In state for week a There Is Rainy climet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण