शपथ घेताच ममतांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा, सर्वांना मोफत लस देण्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

कोलकता  : शपथविधीनंतर तासाभरातच ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत पश्चि म बंगालमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.Mammata tooks review of corona situation

वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त करीत राज्यात सर्वांना मोफत लस द्यावी, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्राद्वारे केली.आज मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सर्वांना मोफत लसीकरणावर भर दिला.



‘‘बंगालमधील जनतेला मोफत लस देण्यासाठी संबंधितांकडून लस खरेदीस परवानगी देण्याची मागणी मी आपल्याला २४ फेब्रुवारी २०२१ च्या पत्रात केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

निश्चितत कालावधीत आणि पारदर्शकपणे सर्वांना लस देण्याची व पुरेशा पुरवठ्याची मागणी त्यांनी केली. रेमडेसिव्हिर आणि टॉसिलीझुबामसह सर्व आवश्याक औषधे राज्यात उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान देशभरात मोफत लसीकरणाचा मुद्दा हिरिरीने मांडला होता. निकालानंतरही यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

Mammata tooks review of corona situation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात