मद्यामुळे कोरोनापासून बचाव ही अफवाच, जनतेने त्याला बळी न पडण्याचे तज्ञांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

चंडीगड : कोरोनाची जागतिक साथ सुरु झाल्यापासून प्रामुख्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक संदेश पसरतो आहे आणि तो म्हणजे मद्यामुळे कोरोनापासून बचाव होतो.Drinking Liquor gives protection from corona is false

प्रत्यक्षात ही अफवाच आहे आणि जनतेने त्यास बळी पडू नये असे आवाहन पंजाबमध्ये सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. के. के. तलवार यांनी केले.ते म्हणाले की, मद्यप्राशनामुळे विषाणूला मारता येऊ शकते असे मानणे चुकीचे आहे. अशा गैरसमजामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. मद्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लोकांनी जास्त प्रमाणावर मद्यप्राशन केले तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, मात्र फार कमी प्रमाणात मद्य घेण्यात कोणतेही नुकसान नाही.

शास्त्रीय निरीक्षणानुसार लोकांना कोरोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर दोन दिवस मद्यपान करू नये अशी शिफारस असल्याची माहिती त्यांनी दिली.

Drinking Liquor gives protection from corona is false

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण