आरोग्य विभागाच्या परीक्षा; दलाल घुसल्याचा आणि टक्केवारीचा आरोप; आरोग्यमंत्र्यांना मागावी लागली माफी!!


प्रतिनिधी

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदांच्या परीक्षा अचानक रद्द कराव्या लागल्याने महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारवर सगळीकडून टीकेचा भडिमार उठला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात दलाल घुसण्याचा आरोप केला. आरोग्य विभागात दलाल घुसलेत. पाच, दहा, पंधर लाख रुपये घेऊन ते विद्यार्थ्यांना पद मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत, असा गंभीर आरोप केला, तर आघाडी सरकार टक्केवारीची फुगडी खेळत आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. health department examinations; Rajesh Tope apologized

हजारो विद्यार्थ्यांची या सगळ्या प्रकारात तारांबळ उडाल्याने अखेर ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना माफी मागावी लागली. परीक्षा घेणाऱ्या कंपनीनेच असमर्थता दाखवल्यामुळे आम्हाला परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला. परीक्षा रद्द कराव्या लागल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात राजेश टोपे यांना विद्यार्थ्यांची माफी मागावी लागली आहे.



परीक्षा रद्द केल्याची बातमी आली तेव्हा आरोग्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही. पण सोशल मीडियातून विद्यार्थ्यांचा उद्रेक झालेला पाहिल्यावर तसेच देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांनी टीकेचा भडिमार केल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना माफी मागण्यास शिवाय पर्याय उरला नाही आणि त्यातूनच त्यांनी अखेर माफी मागितली. परीक्षा होणारच आहेत. जाहीर केलेल्या जागा भरणार आहोत, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

health department examinations; Rajesh Tope apologized

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”