राज्यात गणेशोत्सवात रात्रीची कडक संचारबंदी; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : ‘‘ राज्यात गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रात्रीची कडक संचार बंदी लागू केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच घोषणा करतील,’’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. Strict curfew at night during Ganeshotsav in the state; Health Minister Rajesh Tope’s warning

जालना जिल्ह्यातील शाळासंदर्भात आयोजित टास्क फोर्सची बैठकीनंतर टोपे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सरकार करेल. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’’



राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले होते. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते.

Strict curfew at night during Ganeshotsav in the state; Health Minister Rajesh Tope’s warning

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात